माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते रायगट्टा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

118

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील रायगट्टा येथे भजरंग सि. सि क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक ग्रामपंचायतचे माजी सरपंचा श्रीमती शकुतलाताई माधव कुडमेथे व ग्रामपंचायतचे सचिव एस.एस सडमेक कडून तसेच तिसरा पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे होते तर यावेळी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद माजी सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, अँड. एच के आकदर मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, रायगट्टाचे माजी सरपंचा शकुतलाताई कुडमेथे, राजारामचे माजी सरपंचा जोतीताई जुमनाके, रंगा आलाम, पेसा अध्यक्ष दीपक अर्का, मधुकर गोंगले, व्येकय्या कर्डालावार शंकर दुर्गे, रमेश पोरतेट, सत्यनारायण बात्तूलवार, रामशंकर अंबिलीपवार, कार्तिक तोगमआदि होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार सुरेश्चंद्र जुमनाके यांनी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष तिरुपती चिंतावार, उपाध्यक्ष महेश जाकेवार, सचिव संपत चिटकला सहसचिव सुरेश आलमवार सहसचिव श्रीसागर अंबीलपवार व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here