वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस : झाड अंगावर पडून तिघांचा मृत्यू

714

– नवविवाहित जोडप्यासह चिमुकलीचा मृत्यू
The गडविश्व
पुणे : घरी जात असतांना अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे वडाचे झाड अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुरंदर येथील सासवड वीर मार्गावर घडली. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह लहान भाचीचा मृत्यू झाला
मृत्यू झालेल्या दांपत्याचे नुकतेच लग्न झाले होते. काल जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी अंगावर वडाचे झाड पडून नवविवाहित जोडप्यासह लहान मुलीचा बळी गेला. या दुर्घटनेत सात वर्षांची त्यांची भाची गंभीर जखमी झाली होती मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
काल वादळी वाऱ्यासहा जोरदार पाऊस पडला. पाऊस पडत असताना हे तिघे आपल्या घरी जात होते. या दांपत्यावर पिंपळे गावाच्या जवळ अर्धवट जळालेले वडाचे झाड अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या ईश्वरीचा काल वाढदिवस होता तर रेणुकेश आणि सारिका यांचा नुकताच विवाह झाला होता. या नव दाम्पत्याच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here