गडचिरोली जिल्हयात एका बाधितावर उपचार सुरू

94

– आज कोरोनाबाधितांची संख्या निरंक, तर एक कोरोनामुक्त
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 264 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून कोरोनामुक्तांची संख्या एक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37410 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36637 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 01 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.00 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज कोरोनामुक्तामध्ये कोरची तालुक्यातील 01,जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here