कुलरचा करंट लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

524
जाहिरात

– मूल तालुक्यातील घटना
The गडविश्व
चंद्रपूर : कुलरचा करंट लागल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ७ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे घडली. युग महेश जेंगठे रा.मूल असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे.
युग हा घरातील अंगणात खेळत होता. यावेळी खेळत खेळता त्याने कुलरच्या स्टँड ला हात लावला. हात लावताच त्याला कुलरच्या विद्युत प्रवाहाचा जबर धक्का बसला याने तो जागेवरच कोसळला. दरम्यान ही बाब घरातील व्यक्तींना लक्षात येताच युग ला उपचाराकरिता मूल येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महेश जेंगठे हे मूल येथील प्रतिष्ठित नागरिक, तसेच राकॉ चे पदाधिकारी आहेत. त्यांना दोन मुले असून युग हा लहान मुलगा होता. सदर घटनेची माहिती शहरात पसरताच अनेकांनी जेंगठे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. युग च्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here