दिलासादायक : गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने, आता उरले २ सक्रिय रुग्ण

140
जाहिरात

– आज कोरोनाबाधित तसेच कोरोनामुक्ताची संख्या निरंक
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातुन कोरोनाबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. जिल्हा आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्हयात आज 312 कोरोना तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी नवीन कोरोना बाधित तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या निरंक आहे. तर जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37409 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36635 आहे. तसेच जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता 02 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here