वाघाच्या शिकार प्रकरणी बापलेक वनविभागाच्या ताब्यात

643
जाहिरात

– शिकारीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे जप्त, कालव्यात आढळला होता वाघाचा मृतदेह
The गडविश्व
भंडारा : वाघाची शिकार करून बावनथडीच्या वितरिकेत मृतदेह फेकूण दिल्याच्या कारणावरून तपासाअंती वनविभागाने बाप लेकास अटक केली आहे. तुळशीराम दशरथ लिल्हारे व शशिकांत लिल्हारे अशी आराेपी बापलेकांची नावे आहे. रविवारी तुमसर न्यायालयाने या बापलेकांना पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली आहे.
बावनथडीच्या वितरिकेत ३१ मार्चच्या सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दाेन वयाेवर्ष असलेला वाघ मृतावस्थेत आढळला हाेता. वनविभागाने याप्रकरणी प्रारंभीला अन्य प्राण्यांसाेबत झालेल्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला हाेता. मात्र अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने या वाघाची शिकारच असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले हाेते. साकाेलीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके यांनी तर चक्क ही वाघाची शिकार असल्याचे सुचविले हाेते.
तपासाचे सूत्रे अधिक वेगाने फिरवित बपेरातील पाच जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, तुळशीराम व शशिकांत लिल्हारे या बापलेकांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अटक केलेल्या बापलेकाला रविवारी तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमाेर हजर करण्यात आले. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नाेंदवित दाेघांनाही पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली. तपासादरम्यान तुळशीराम लिल्हारे यांच्या शेतातून काही वन्यप्राण्यांची हाडे, कवटी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या व इतर साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहे.
संपूर्ण घटनाचक्रात तपास अधिकारी एसीएफ साकेत शेंडे, नाकाडाेगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी मनाेज माेहिते, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी गाेविंद लुचे, भरारी पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यासह अन्य कर्मचारी व पाेलीस विभागाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here