रांगी ग्रामपंचायत प्रभात बक्षिस पुरस्काराने सन्मानित

373

The गडविश्व
धानोरा : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम अभियान अंतर्गत सन २०१९-२० च्या प्रभात बक्षिस पुरस्काराने काल २५ मार्च २०२२ रोजी सन्मानित करुन गैरविन्यात आले.
संत गाडगेबाबा ग्राम अभियानाअंतर्गत धानोरा पंचायत समिती च्या वतीने प्रभात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स गट विकास अधिकारी कोमलवार, कृषी अधिकारी बाबर , पंचायत विस्तार अधिकारी ठाकरे , कृषी विस्तार अधिकारी ठाकरे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा मध्ये सन २०१९ -२० या वर्षाचा प्रभात बक्षीस १० हजार रुपयांचा धनादेश नुकताच पंचायत समिती सभागृह मध्ये रांगी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंचा सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम व सचिव पांडुरंग बुराडे यांनी स्वीकारला. तसेच यावेळी पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here