देसाईगंज : देशी दारूसह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

337
जाहिरात

– देसाईगंज डीबी पथकाची कारवाई
The गडविश्व
देसाईगंज : गडचिरोली जिल्हयातील अवैध धंदयांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतांना डीबी पथक देसाईंगंज यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अधारे धाड मारून देशी दारू व दुचाकी वाहनासह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केले आहे.
गडचिरोल जिल्हात अनेक अवैध धंदयांना उत आले आहे. सदर अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतांना देसाईगंज पोलीसांनी २४ फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करत ४० हजार रूपये किंमतीची देशी दारू व होंडा कंपनीची एक्टीवा दुचाकी क्रमांक एम.एच.३३ एक्स ९३५४ किंमत रूपये ७० हजार असा एकुण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीस ताब्यात घरून त्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक समिर शेख व कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या नेतृत्वात डीबी पथक पोलीस स्टेशन देसाईगंज यांनी केली.
सदर कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here