जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

228
जाहिरात

– न्यू-यंग स्टार कबड्डी क्लब मल्लेरा जय गोंडवाना पी.आर.सी.सी.कोलपल्लीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं.देवलमारी अंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली येथे जय गोंडवाना पी.आर.सी.सी.कोलपल्ली द्वारा भव्य व्हालीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम,द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवलमारी ग्रामपंचायत चे सदस्य महेश लेकुर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देवलमरी चे सरपंच लक्ष्मण कन्नाके , इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, हरीश गावडे, कोलपल्ली मुख्याध्यापक एस .बी.झाडे, बुच्चा आत्राम, मनोज सोयाम, मुकेश आत्राम, प्रदीप आत्राम, राजकुमार चालूरकर, विश्वनात गावडे तसेच महिला पुरुष व युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here