एसटीच्या विलीनीकरणाच्या अहवालावर २२ फेब्रुवारीला सुनावणी

234
FILE PHOTO

The गडविश्व
मुंबई : अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही खंडपीठासमोर ठेवण्यात आला. या प्रकरणावर २२ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलक मुंबईत जमा होण्याची शक्यता आहे.
तसेच संप करणारे एसटी कर्मचारी आंदोलक मुंबईत मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये बंदोबस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here