दुर्गम भागातील दराची येथे क्लिनिक : १४ रुग्णांनी घेतला पूर्ण उपचार

69
जाहिरात

The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या दराची येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकमध्ये एकूण 14 रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दराची येथे आयोजित क्लिनिकमध्ये दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या 14 रुग्णांनी भेट दिली. दरम्यान अरुण भोसले यांनी रुग्णांना समुपदेशन केले तसेच संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगितले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी यांनी केले. यावेळी गाव संघटनेच्या अध्यक्ष चंद्रकला उईके, गाव पाटील लच्छुराम उईके, ग्रामसभा अध्यक्ष अवसू नरोटे, सचिव रामू उईके, पांडुरंग आतला यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here