कोटगल येथील क्लिनिकला उत्तम प्रतिसाद

66
जाहिरात

The गडविश्व
गडचिरोली : नजीकच्या कोटगल येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तम प्रतिसाद देत एकूण २४ रुग्णांनी उपचार घेतला.
दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार असून उपचाराने बरा होऊ शकतो. दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावा, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गावात व शहरात व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जाते. गडचिरोली तालुक्यातील कोटगल येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकमध्ये २४ रुग्णांनी नोंदणी करीत पूर्ण उपचार घेतला .
यावेळी संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेतली. तसेच अरुण भोसले यांनी दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत रुग्णांना समुपदेशन केले. या उपक्रमाचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here