गडचिरोली जिल्ह्यात आज १२० नव्या बाधितांची नोंद तर २०० कोरोनामुक्त

29

The  गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 969 कोरोना तपासण्यांपैकी 120 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 200 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36802 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 35177आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 859 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण
766 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.33 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.33 टक्के तर मृत्यू दर 2.08 टक्के झाला आहे.
आज 120 नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 16,अहेरी तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 34, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 29, सिरोंचा तालुक्यातील 05,कुरखेडा तालुक्यातील 05,आणि वडसा तालुक्यातील 08 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 200 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 15,अहेरी तालुक्यातील 09,आरमोरी तालुक्यातील 12,भामरागड तालुक्यातील 11,चामोर्शी तालुक्यातील 28,एटापल्ली तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 09, मुलचेरा तालुक्यातील07, सिरोंचा तालुक्यातील 22,कोरची तालुक्यातील 02,कुरखेडा तालुक्यातील 38,आणि वडसा तालुक्यातील 35 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here