दारूमुक्त होण्यासाठी ४८ रुग्णांनी घेतला उपचार

39

-आरमोरी, गडचिरोली, धानोरा व भामरागड येथे क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांसाठी मुक्तीपथ अभियानातर्फे तालुका व गाव पातळी शिबिराच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. आरमोरी, गडचिरोली, धानोरा व भामरागड येथील तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४८ रुग्णांनी दारूमुक्त होण्यासाठी उपचार घेतला.
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे शिबिरांचे आयोजन केल्या जाते. आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकाच्या मागे शिक्षक कॉलनीतील मुक्तीपथ तालुका कार्यालयात दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १० रुग्णांनी भेट दिली. गडचिरोली शहरातील बस डेपो जवळील स्वराज हेल्थ क्लब समोर असलेल्या मुक्तिपथ तालुका कार्यालयात १० रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. तसेच धानोरा व भामरागड येथे बुधवारी आयोजित क्लिनिकमध्ये २८ अशा एकूण ४८ रुग्णांनी दारूमुक्त होण्यासाठी उपचार घेतला. सोबतच दारूचे दुष्परिणाम सांगत समुपदेशन व रुग्णांवर औषधोपचार केल्या गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here