रामसागर येथे 20 रुग्णांवर उपचार

45
जाहिरात

THE गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण 20 जणांनी उपचार घेतला व दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध गावात व तालुका स्थळावर आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून अनेक व्यसनी रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. रामसागर येथे आयोजित क्लिनिकचा 20 रुग्णांनी लाभ घेतला. मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे यांनी क्लिनिकचे नियोजन केले. उपचारार्थ आलेल्या रुग्णांना अरुण भोसले यांनी समुपदेशन करीत दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here