उद्यापासून देशभरात १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात

71
जाहिरात

THE गडविश्व

वृत्तसंस्था / मुंबई : उद्या ३ जानेवारी पासून देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी काल १ जानेवारी पासून कोविन (CoWIN) अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. देशातील १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
ज्या मुलांचा जन्म २००७ किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयाकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारने १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

अशी करावी लागणार लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी –

कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन ऍप वरून लसीकरणासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
नोंदणीसाठी सर्वप्रथम https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला अकाऊंट ची संपूर्ण माहिती दिसेल. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकणार आहे. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नाव आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादे नाव डिलिट करण्याचाही पर्यायही याठिकाणी देण्यात आला आहे.
लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागणार आहे.
पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसारही यादी यात शोधू शकता. त्यामुळे तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत किंवा नाही हे त्यात दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे.
तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.
लहान मुलांच्या लसीकरणासाठी १ हजार ५०० व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिएक्शन झाले तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणासाठीही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिएक्शन झाली नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here