गडचिरोलीत १५ दिवसांची जमावबंदी; माओवादी हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

6

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : छत्तीसगडमधील अबुजमाड परिसरात नुकत्याच झालेल्या चकमकीत २७ माओवादी ठार झाल्यानंतर माओवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा आणि आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत शस्त्रे, स्फोटके, दगड, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा करणे, सभा घेणे, मिरवणुका काढणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे यास कडक बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.
ही जमावबंदी संपूर्ण जिल्ह्याच्या क्षेत्रात लागू राहणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews # #गडचिरोली #जमावबंदी #माओवादी #कायदासुव्यवस्था #GadchiroliNews #Section37
#PoliceAlert #SecurityMeasures #DistrictAdministration #BreakingNews #MaoistActivity #LawAndOrder #महाराष्ट्रबातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here