भीषण चकमकीत 12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद
– शस्त्रे व गोळाबारूद जप्त
The गडविश्व
दंतेवाडा / विशेष प्रतिनिधी, दि. ०३ : छत्तीसगडमधील दंतेवाडा-बीजापुर बॉर्डरवर सुरक्षा दलाने बुधवारी सकाळी मोठे यश मिळवत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्यांमध्ये डिव्हिजनल कमिटी मेंबर (DVCM) वेल्ला मोडियमचा समावेश असल्याची अधिकृत पुष्टी बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी केली आहे. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या चकमकीत DRG चे तीन जवान हेड कॉन्स्टेबल मोनू वडारी, रमेश सोडी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले तर दोन जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.https://x.com/ANI/status/1996235317570105723?s=19
बीजापुर SP जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, DRG, STF, COBRA आणि CRPF यांची संयुक्त टीम बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून वेस्ट बस्तर डिव्हिजनमध्ये सर्च ऑपरेशनवर होती. घनदाट जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली आणि 12 नक्षलवाद्यांना ठार केले.
घटनास्थळी SLR, 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात गोळाबारूद जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी सील केले आहे. सर्चिंग अजूनही सुरू आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.”
#thegdv #thegadvishva #cg news #gadchirolipolice #gadchirolinews #NaxalEncounter #Chhattisgarh #Dantewada #Bijapur #DRG #SecurityForces #AntiNaxalOperation #BastarRange #IGSundarrajP #JointOperation #BreakingNews #IndianForces #MaoistEncounter #NaxalAffectedArea #SLRRecovered #Martyrs #CRPF #COBRA #STF














