The गडविश्व
गडचिरोली : ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे वैद्यकीय व दंत शिबीर 10 मार्च 2022 ते 13 मार्च 2022 पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 10 मार्च 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता सदर आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात होत असून या आरोग्य शिबीरात विशेष वैद्यकीय तज्ज्ञाकडुन तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 11 मार्च रोजी कॅन्सर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, सहउद्घाटक नगराध्यक्ष न.पं.चामोर्शी सौ.जयश्रीताई वायलालवार,कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष न.पं.चामोर्शी लोमेश बुरांडे, पोलीस उपनिरिक्षक, विपीन शेवाळे, तसेच विशेष अतिथी म्हणून उपसंचालकआरोग्य सेवा, नागपूर, डॉ.संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय जठार, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.सतीश सौलंकी, वैद्य. अधिकारी, डॉ.बागराज धुर्वे, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक उपसंचालक, मनिष नंदनवार यांची उपस्थिती राहणार आहे. तरी भव्य शिबीराचा मोठया संख्येने लाभ घ्यावा असे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय ,चामोर्शी डॉ.आय.जी.नागदेवते, तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी, डॉ.प्रफुल हुलके यांनी केले आहे.
