The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑक्टोबर : धानोरा तालुक्यातील चतगाव येथील सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे सलग चार दिवस वेगवेगळ्या गावामध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण ५८ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला.
सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे नेहमीच गावपातळीवर मानसिक आरोग्य शिबिरा घेण्यात येत असते, या महिन्या मध्ये सुद्धा सलग चार दिवस मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. ज्या मध्ये भेंडीकनार, येडमपायली, गट्टेपायली, सरांडा या गावांतील एकूण ५८ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला. यामध्ये मुख्यता उदासीनपणा, चिंता-चिंता वाटणे, नैराश्य यावर निदान व मोफत उपचार करण्यात आला व जास्तीत जास्त रूग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. अशा प्रकारच्या एक दिवसीय मानसिक आरोग्य शिबिरांची मालिका पुढे पण सुरू राहणार आहे. हे मानसिक आरोग्य शिबीर “सर्च” मधील मानसिक आरोग्य विभागाद्वारे आयोजिता करण्यात येते.
