२२ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन

271

The गडविश्व
गडचिरोली, १५ फेब्रुवारी : SUZUKI MOTOR GUJRAT PRIVATE LIMITED या कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे २२ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी १०.०० वाजता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी मुलाखत होणार असून वर्ष २०१८, २०१९, २०२०, २०२१ व २०२२ मध्ये Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & Die Maker, Plastic Processing Operator, Tractor Mechanic and Painter General या व्यवसायातून आय. टी.आय. उत्तीर्ण झालेले उमेदवार या करीता पात्र आहेत. मागील दोन वर्षा पासून SUZUKI MOTOR या जिल्हयात भरती आयोजित करत असून २५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत.
सदरी भरती मेळाव्याला जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारांनी सहभागी व्हावे असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता ९५९५७४०९१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य शास.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here