The गडविश्व
सावली : तालुक्यातील साखरी येथील जि. प. उच्च प्राथ. शाळेत विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणेचे हस्ते भारताचे शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जी. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर स्पर्धेला सुरूवात करण्यात आली त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन डांस स्पर्धा,मी आहे सूर्यमाला,ओळखा पाहू मी कोण ?,मी व माझी संज्ञा,रोग व त्यावरील प्रतिबंधक लस कोणती आणि कोणी घ्यावी?, निबंध स्पर्धा(शालेय शिक्षण ऑनलाईन की ऑफलाईन असावे), अपूर्व विज्ञान मेळावा, मान्यवरांचे मार्गदर्शन, विज्ञान गित स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्य स . अध्यक्ष श्री महादेव मडावी, शा.व्यस ., उपाध्यक्षा सौ. दर्शनाताई भांडेकर, श्री आशिष भांडेकर, शा.व्य.स सदस्या कु. मोनिका भूरसे यांची उपस्थिती तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन ताडाम, परिक्षक कामीडवार, मार्गदर्शन घोंगे आणि रामटेके, आभार चौधरी यांनी मानले.
मागील तीन वर्षांपासून जि.प.उच्च प्राथमिक शाळा साखरी येथे सतत विविध स्पर्धा व मुलांचे नेतृत्व गुण वाढविण्यासाठी तेथील शिक्षक उत्कृष्ठ काम करीत असल्यामुळे गावात शिक्षकांची प्रशंसा केली जात आहे.
