सहकारी संस्थांना आमदार गजबें ची दमदाटी

613

– शेतकऱ्यांची पिळवणुक खपवुन घेणार नाही
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, २३ नोव्हेंबर : तालुक्यातील शासकिय धान खरेदी विक्री संस्थांकडुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करतांना नियमबाह्य पद्धतीने गोदाम भाडे व हमालीच्या स्वरुपात ५० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वसुली केली जात असल्याची तक्रार आमदार कृष्णा गजबे यांना प्राप्त होताच शेतकऱ्यांसह खरेदी विक्री केंद्रावर जावुन आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांची पिळवणुक केल्यास खबरदार असा इशारा दिला.
देसाईगंज तालुक्यात पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्याचे धान खरेदीचे अधिकार काही खाजगी संस्थांना देण्यात आले. या संस्थांनी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी ओलाव्याचा बहाणा करुण टाळाटाळी करणे सुरु केले. शेतकरी किरायाच्या ट्रॅक्टरने धान विक्रिसाठी आणत असल्याने आपल्यावर अतिरिक्त भुर्दंड बसेल या भितीपोटी सहकारी संस्था जे नियम लावेल त्याला लाचारीपोटी मुक सम्मती दर्शवु लागला याचा गैरफायदा घेत ओलाव्याच्या वजनासह हमाली व गोदाम भाडे प्रति क्विंटल ५० रुपये प्रमाणे लुट सहकारी संस्थांनी सुरु केली. या प्रकरणाची चाहुल लागताच न.प. देसाईगंजचे माजी सभापती सचिन खरकाटे, माजी नगराध्यक्ष श्याम उईके, सचिन वानखेडे, चौपणदास विधाते, यांनी सहकारी संस्थांच्या गोदामात जाऊन शेतकऱ्यात जागृती केली. एवढेच नव्हे तर जिल्हा पनण अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून उपोषणाला बसण्याची दमदाटी देत क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना संपुर्ण प्रकार समजावुन सांगितला. या सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची पिळवनुक करण्याची दुसरी क्लूप्ती शोधुन काढत तब्बल दोन दिवस धान खरेदी केंद्र बंद ठेवले ही संपुर्ण माहिती गोळा करुण आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हा पनण अधिकारी तिवाडे यांना खरेदीचे गोदाम तात्काळ सुरु करा अशी सुचना करत आज शेतकऱ्यांसह गोदामला भेट देवुन शेतकऱ्यांकडुन अतिरिक्त पैसे वसुल केल्यास खपवुन घेणार नाही असा ईशारा दिला.
या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजुभाऊ जेठानी, सुनील पारधी ओबीसी जिल्हाध्यक्ष, सचिन खरकाटे मा.न.प. सभापती, श्याम उईके मा. नगराध्यक्ष, सचिन वानखेडे युवामो जिल्हा उपाध्यक्ष, नरेश विठ्ठलानी, चौपनदास विधाते यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#MLA Krushana Gajbe #Desaiganj #Sahakari sanstha #The Gadvishva #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here