The गडविश्व
गडचिरोली : मागच्या ३० वर्षांपासून सतत गडचिरोली च्या दुर्गम भागात सेवा पुरवत असणाऱ्या मां दांतेश्र्वरी दवाखान्यात मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवार 14 मूत्रपिंड विकार ओपीडी सुरू होत आहे. यामुळे गडचिरोली आणि आजु बाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. मूत्रिंडाचे आजार हे नुसतेच दुर्मिळ आजार नसून त्यांचा उपचार ही खर्चिक असतो. पण सर्च हॉस्पिटल च्या रूपाने सवलतीच्या दरात किंवा मोफत या सुविधा पुरवल्या जातील. लघवीत रक्त येणे, अनेक वर्ष मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणारे रुग्ण, अनियंत्रित रक्तदाब, पायावर, चेहऱ्यावर किंवा शरीरावर सूज, लघवी कमी होणे, डायलिसिस वर असणारे रुग्ण, लघवीला झालेला जंतू संसर्ग अशा अनेक अडचणींवर आणि रोगांवर नागपूरच्या डॉ. विरेश गुप्ता या तज्ञ तसेच अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व उपचार या वेळी मिळेल. १४ मे पासून या ओपीडी ची सुरुवात होत असून त्या पुढच्या दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही सुविधा सर्च हॉस्पिटल च्या माध्यमातून पुरवली जाईल.
