The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑक्टोबर : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशच्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी व आंबेटोला या गावात ११ व १२ ऑक्टोबर ला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री भ्रूणहत्या, रॅली आदी विषयांवर स्पर्धा घेऊन मुलींनी स्वतः चे अधिकार ओळखावे,त्यांना समान अधिकार मिळावे, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात भाग घ्यावा, त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यापनात सहकार्य मिळावे, मुलिंचा शिक्षणात रस कायम राहावा व त्यांना शाळेतील अध्यापन करण्यासाठी मदत मिळावी या हेतूने मॅजिक बस संस्थे तर्फे बालिका दिवस साजरा करण्यात आला.या दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पोस्टर मेकिंग, वन ॲक्ट प्ले आदी स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देण्यात आले.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील १२०० मुलांसाठी “खेळाच्या माध्यमातून विकास ” हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य,गट कार्य,समस्या सोडविणे,शिकण्यातुन शिकणे, स्व-व्यवस्थापन, इंग्लिश स्पीकिंग व विषयात्मक शिक्षण (सी एल सी) द्वारे संख्या व साक्षरता ज्ञान आदी कार्यक्षेत्रावर काम करीत आहे . सदर कार्यक्रम हा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असून १२ ते १६ वयोगटातील मुलामुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प. उच्च प्रा.शाळा आंबेशिवणी येथील मुख्याध्यापक बांबोळकर, प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख बारसिंगे , सागर आत्राम, पुंडके, जेंगठे, बल्लमवार मॅडम व शाळेतील मुले हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
या दरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. मुलींनी स्वतःचे आरोग्य आणि शिक्षणामध्ये मुलींनी परिश्रम घेत पुढे जाऊन ध्येय गाठावे अशा शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच प्रकल्पामध्ये विविध स्पर्धा मधून उत्साहात घेण्यात येत आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे, समुदाय समन्वयक दिवाकर सोनबावणे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली देवेंद्र हिरापूरे यांच्या सहकार्याने संपन्न झाले.
