The गडविश्व
चिमुर, ३ ऑगस्ट : तालुक्यांतील मसली येथील रहीवाशी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नामदेव नन्नावरे हे काही दिवसा पासुन आजारी होते हि बाब माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतीश वारजूरकर यांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ मसली येथे जाऊन भेट देत आर्थिक मदत केली.
हालकीच्या परस्थितीत नन्नावरे कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा उपचार केला आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली त्यांचा मुलगा व पत्नी कशीही मोल मजुरी करून कुटुंब चालवत आहे ही सर्व बाब येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिश वारजुरकर यांना कळताच त्यांनी लगेच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषण ढोक उपस्थित होते.
