The गडविश्व
मुंबई : राज्यात टीईटी घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा परीक्षा घोटाळा या पाठोपाठ आता पोलीस भरती मध्येही मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे . चौकशी करून दोषींवर कारवाई करू असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे
पोलीस भरतीत डमी उमेदवार परीक्षेला बसविण्यात आल्याचे उघडकीस आले असून परीक्षेला मिळता चेहरा असणाऱ्याला बसविण्यात आले. परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांनी चक्क ३ लाख रूपये मोजले असल्याचेही कळते.
मुंर्बइं पोलीस दलात 14 नोव्हेंबर रोजी 1076 शिपाई पदासाइी भरती घेण्यात आली होती. यासाठी 6 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मात्र पोलीसांनी या मैदानी चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डींग तपासले असता धक्कादाय वास्तव समोर आले. शारीरीक क्षमता नसलेल्या उमेदवारांच्या जागी दुसऱ्याच उमेदवारांना उभे केल्याचे निदर्शनास आले. या पोलीस भरती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे तर 8 जण फरार आहे.
काही प्रकरण पुढे आलेली आहेत, पोलीस भरतीवेळी स्वत: त्या ठिकाणी परीक्षा देण्याऐवजी डमी उमेदवार बसवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलीस भरती परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक असून कोणीही दोषी असेल त्याची गैर केली जाणार नाही, दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
