– क्षेत्र वर्चस्वासाठी जावून परत येत असतांना झाला आयईडी स्फोट
The गडविश्व
बिजापूर (Bijapur) CG , २९ सप्टेंबर : सीआरपीएफ जवानांची तुकडी क्षेत्र वर्चस्वासाठी धर्मारामहून चिंतावगुकडे जात असतांना नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या आयईडी प्रेशर बॉम्ब चा स्फोट झाल्याने एक जवान शहीद झाल्याची घटना बुधवार २८ सप्टेंबर रोजी बिजापूर जिल्ह्यातील पालमेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सत्यपाल सिंह असे शहीद जवानाचे नाव आहे. ते हरियाणातील रोहतकचे रहिवासी होते.
बिजापूरचे एसपी अंजनेय वार्ष्णेय यांनी सांगितले कि बुधवारी सीआरपीएफचे जवान धर्मारामहून चिंतावगुकडे क्षेत्र वर्चस्वासाठी जात होते. सदर परिसर हा पूर्णपणे नक्षल्यांचा बालेकिल्ला समजला जातो. अशातच सीआरपीएफचे जवान परतत असताना चिंतवगु नदीजवळ सीआरपीएफ जवान सत्यपाल सिंह यांचा पाय प्रेशर आयईडीच्या तावडीत सापडला व स्फोट झाला यात जवान जागीच ठार झाले. दरम्यान इतर जवान सध्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. शहीद जवानाचे पार्थिव प्रथम हैदराबादला व तेथून त्याच्या गावी नेण्यात येणार होते व आज गुरुवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी विजापूरच्या पोलीस लाईनमध्ये शहीद जवानाला गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

#Bijapur #Chattisghadh # presherbomb #crpf #police