– सहा महिण्यापूर्वी हत्तीच्या कळपाने घातला होता धुमाकूळ
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ सप्टेंबर : तालुक्यातील जंगल परिसरामध्ये शेत शिवारात तसेच गावात सहा महिन्यापूर्वी हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ घालत भर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांची घरे उध्वस्त केल्याने कुटुंब उघड्यावर आले होते त्यांच्यापुढे घरात राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. सदर घटनेचे पंचनामे धानोरा उत्तर वनविभाग चे मेडेवार यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमू नी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता उत्तर वन विभागाने वारंवार पाठपुरावा केला आणि सदर नुकसानग्रस्त व्यक्तींना घराच्या नुकसानीची नुकसान भरपाई नुकतीच वन विभागाने मिळवून दिली आहे.
छत्तीसगड राज्यातून रानटी हत्तीचा कळप सहा महिन्यापूर्वी धानोरा तालुक्यातील जंगलात वास्तव्यास होता. तेव्हा हत्ती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नासधूस करत होते, सोबतच जंगलात असणाऱ्या छोट्या छोट्या गावात जाऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान केले त्यामुळे त्या त्या परिसरातील आदिवासी बांधवांपुढे घराची पडझड आणि नुकसान झाल्याने मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झालेला होता. झालेल्या नुकसानी बद्दल मदतीची याचना नुकसानग्रस्तांनी वनविभागाकडे केलेली होती. वन विभागाने वेळीच दखल घेऊन पंचनामा करून उत्तर वन विभागातील लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे. सदर नुकसान भरपाई चे चेक नुकतेच गावागावात जाऊन वाटप करण्यात आले आहार.
यामध्ये कारजी खंडू परसा रा. (अर्जुनीटोला) 10020 , सहागू कोरेटी (अर्जुनी टोला )16700, रामलाल कुमोटी (अर्जुनी टोला) 15000, श्रीमती गिरजाबाई दुगा (अर्जुनी टोला) 40000 मनसाराम कोरेटी (अर्जुनीटोला) 50000, श्रीराम कोरेटी (अर्जुनी टोला) 35000, हंगरू मडावी (बाजीराव टोला) ता.आरमोरी 6500, बघूजी ताडाम ( दवंडी ) ता. आरमोरी जि. गडचिरोली 16800, गंगाराम धोंडू आहा (दवंडी ) तालुका आरमोरी 12100, सोनू आचला (रा. फुलकोडो )तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली11700, परसराम शामराव ( रा. बांधोना) 5000, नरेश शामराव किरगे (रा.बांधोना) 5000 , गणेश उशेंडी (चुडियाल) 7500, सोनकी परसा(अर्जुनीटोली) 11000 ,सुखदेव रवी परसा रा. (अर्जुनी टोला )11700 यांना वाटप करण्यात आले. असा एकूण दोन लाख पंचवीस हजार विस रुपये वनविभाग ने मदत दिली. या मदती मुळे गावातील नागरिकांनी वनविभागचे आभार मानले आहे.
