The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : एक सशक्त आणि एकजूट समाज निर्मिती साठी संघ शक्ती गरजेची आहे. समाज संघटित असेल तर समाजहिताच्या गोष्टी घडू शकतात आणि म्हणून समाज संघटना गरजेची आहे असे प्रतिपादन प्रमोदजी चिंतलवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धानोरा तालुका विजया दशमी उत्सवात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
समाजीक शक्तीतिच्या संघटनेतुन समाजात चांगले कार्य आणि बदल घडवून आनता येतात आणि संघटित हिंदू समाज सशक्त समाजाचा आधार होऊ शकतो असेही त्यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरात बरेच समजोपयोगी सेवाकार्य चालत असतात. समाजात सक्रिय कार्यकर्ते आणि सजन शक्ती निर्माण करण्याचे काम संघाच्या शाखेतच होत असते.वर्षभरात एकूण ६ उत्सव संघातर्फे साजरे केले जातात. त्यात विजयादशमी हा एक उत्सव दसरा पासुन पासून २० ते २५ दिवस पर्यंत साजरा केला जातो व यात आपल्याकडे असलेल्या शस्त्रांचा पूजन केला जातो. अशाच प्रकारे धानोरा तालुक्याचा विजया दशमी उत्सव १५ ऑक्टोबर ला किसान भवन धानोरा येथे पार पडला.
या मध्ये धानोरा येथील किसान भवन ते बाजार चौकातून पथ संचलन काढण्यात आले. आणि पाहुण्या कर्वी परमपवित्र भगवा ध्वज आणि प्रतिमांचे पूजन करून व शस्त्र पूजन करून उत्सवाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी राखडे महाराज वि.ही.प.धर्माचार्य धानोरा, प्रमुख वक्ते प्रमोदजी चिंतलवार होते. कार्यक्रमात विकास वडेट्टीवार (जिल्हा सहकार्यवाह), पवन डहारे (जिल्हा प्रचारक गडचिरोली जिल्हा) जनार्धन कठाने (तालुका कार्यवाह) चेतन मोहूर्ले, संघाच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका-पर्यवेक्षक आणि धानोरा नगरातील स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश उईके, अंकुश मंगाम यांनी हातभार लावला. यामध्ये शुभाषित उमेश कुमार मडावी, अमृत वचन तुषार कोकोडे, वैयक्तिक गीत आशिष उईके आणि सांघिक गीत जनार्धन कठाने यांनी घेतला. शेवटी प्रार्थना घेऊन उत्सवाचा समापन करण्यात आला.
