– तालुका युवक काँग्रेस कमिटीचा मुख्याधिकाऱ्याना यांना निवेदनातून इशारा
The गडविश्व
देसाईगंज(Desaiganj), १३ सप्टेंबर : शहरातील फवारा चौकात मोठमोठे खड्डे पडलेले असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष असून येथील खड्डे बुजविण्यात बुजवा अन्यथा बेश्रमाचे झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्यधिकारी यांना निवेदनातून तालुका युवक काँग्रेस कमिटीने केला आहे.
देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील नागरिक प्रामुख्याने या ठिकाणी कामानिमित्त येत असतात. तथापि देसाईगंज शहरात विविध शासकीय कार्यालय असून खेड्यापाड्यातील नागरिक सुद्धा आपल्या शासकीय कामाकरिता त्याच मार्गावरून आवागमन करतात. मागील सहा महिन्यापासून स्थानिक पफवारा चौक मेन रोड वरती मोठे मोठे खड्डे पडून देखील नगर परिषदेकडून कोणतीही दाखल घेण्यात आली नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून खड्डे भरण्यात आलेले नाहीत वारंवार विनंती करून देखील स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे . अनेकदा खड्ड्यांपासून स्थानिक नागरिकांना आवागमन करण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एन पावसाच्या दिवसात खड्डे पाण्याने तूटुंब भरल्याने नागरिकांना खड्ड्यांना अंदाज न समजल्याने मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फवारा चौक देसाईगंज शहरातील एकमेव मुख्य चौक असल्यामुळे या ठिकाणावरून चारही बाजूने आवागमन होत असते. मुख्य मार्गावरच डांबरीकरण रोड उकलून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन अवागमन करावे लागत आहे. करिता येणाऱ्या दोन दिवसात आपल्याकडून खड्डे बुजविण्यात यावे तसे न झाल्यास तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने खड्यांमध्ये बेशरमाचे झाडे लावून निषेध आंदोलन असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकुभाऊ बावणे, तालुका युवक काँग्रेस महासचिव पंकज चहांदे, ओबीसी संगघनेचे शहर अध्यक्ष सागर वाढई, शहर युवक काँग्रेस सचिव विवेक गावळे, गोविंदा चिंचोळकर, नरेश लिंगायत,अमित सलामे,अमन गुप्ता उपस्थित होते.
