जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुर्जा (बु) येथील जि.प. शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन

308

– ग्रा.प.मेडपल्ली अंतर्गत गुर्जा (बु) येथील शाळेला मिळाली नवी वर्ग खोली
The गडविश्व
अहेरी, ८ ऑक्टोबर : जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या गुर्जा (बु) येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत वर्गखोलीची कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होती. दरम्यान अजय कंकडालवार हे जि.प.अध्यक्ष असतांना यांच्याकडे वर्गखोली उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता कंकडालवार यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत वर्ग खोली मंजूर करून दिली.
सदर वर्ग खोली मंजूर झाल्याने नुकतेच जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळपल्ली ग्रामपंचायत चे सरपंच निलेश वेलादी होते तर प्रमुख अतिथी म्हणून पाटाळी पलो, रमेश पुपरेड्डीवार, मारोती देवतळे शिक्षक, विल्सन गावळे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, टिंकू सलम, कार्तिक तोगम, संतोष येनगंट्टीवार, संतोष वसाके तसेच गावातील महीला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here