The गडविश्व
गडचिरोली, २० ऑगस्ट : तालुक्यातील जेप्रा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहीहंडी कार्यक्रम आज २०ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम जि.प . उच्च प्राथमिक शाळा जेप्रा व मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बांबोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक भजे, शिक्षिका भैसारे, रामटेके, हर्षे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी राधा कृष्णा वेशभूषा करून नृत्य सादर केले व त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. नृत्य सादरीकरण करण्याकरिता मॅजिक बसचे लेखाराम हुलके, रीना बांगरे यांनी सहकार्य केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
