गडचिरोली : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत फसवणुकीचा गुन्हा दाखल

26

चामोर्शी : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत फसवणुकीचा गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ९० दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथील इसमाविरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कामगार कल्याणकारी योजनांमध्ये बोगस कागदपत्रे व दलालांच्या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता पथक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात गोंदिया व गडचिरोली येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने ४ जुलै २०२५ रोजी नगर परिषद चामोर्शी येथे भेट देऊन ९० दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली. यावेळी संबंधित कार्यालयाने स्पष्ट केले की, अशा स्वरूपाचे कोणतेही प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले नाही. या बाबतचा अधिकृत लेखी खुलासा मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी यांनी दिला आहे.
या प्रकरणाची दखल घेत सरकारी कामगार अधिकारी सिमा शिंदे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. शासनाच्या कामगार कल्याणकारी योजनांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अशा प्रकारच्या बोगस कृत्यांविरोधात कारवाई सुरू असून, इतर प्रकरणांचीही चौकशी सुरू असल्याचे सिमा शिंदे यांनी कळविले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #फसवणूक #बनावटप्रमाणपत्र #कामगारकल्याण #शासनयोजना #गडचिरोली #चामोर्शी #घोटाळा #बोगसकागदपत्रे #MaharashtraNews #LabourWelfareScam #CrimeReport #FraudAlert #विचारांचीचौकशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here