-आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा संस्थेचा उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑगस्ट : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ कुरखेडा द्वारा संचालित केंद्र शासन पुरस्कृत महिला व बालविकास प्रभावी उपक्रम चाइल्ड लाईन १०९८ गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरातील गोकुळ नगर, कारगिल चौक, इंदिरानगर, कॉम्प्लेक्स परिसर, आय. टी. आय. चौक, आरमोरी रोड, गांधी चौक, बाजार चौक, तसेच तालुक्यातील मुळझा, कनेरी, गोगाव, भगवानपूर , मेंढा, वाकडी, शिवनी, आदी ठिकाणी आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात बालमजुरीमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम बालविवाहमुळे बालकांवर होणारे परिणाम तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा, कामगार प्रतिबंधक कायदा आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चाईल्ड लाईन म्हणजे काय? चाईल्ड लाईन १०९८ टोल फ्री क्रमांकाचा वापर केव्हा आणि कसा करावा बालकांच्या विविध समस्या बाल लैंगिक शोषण, बालविवाह, बालमजुरी, बालकांना नाहक मारहाण करणे, बालकांना बळजबरीने भीक मागण्यास प्रवृत्त करणे, बालकांचे असामाजिक कृत्याकरिता अपहरण करणे, रस्त्यावर वास्तव्यास राहणारी बालके, हरवलेले बालके व त्यांच्या विविध समस्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक वैशाली दुर्गे सदस्य, अविनाश राऊत, भारती जवादे, मयुरी रकतसिंगे, सौरभ शेंडे, संदिप लाडे, विजयालक्ष्मी वघारे, स्वयंसेवक प्रकाश गुरणुले यांनी मार्गदर्शन केले.
