– आझादी का अमृत महोत्सव
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधुन संपुर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्याने ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३ ऑगस्ट २०२२ ला सकाळी ७.३० वा. भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर सायकल रॅली ही १३ ऑगस्ट २०२२ ला सकाळी ७.३० वा. इंदिरा गांधी चौक येथून सुरु होवून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समारोप होणार आहे. सदर रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच गडचिरोली येथील नागरीक सहभागी होणार आहेत. तसेच इच्छुक नागरिकांनी सायकल सह रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे असे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.
