खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

31

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै २०२५ रोजी गडचिरोली शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून प्रेरणा घेऊन अनुसूचित जाती सेल, युवक काँग्रेस, शहर काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मित्रपरिवारातर्फे हे उपक्रम राबवले जात आहेत.
सकाळी ९ वाजता दुर्गा मंदिर, कॅम्प एरिया येथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता महिला रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांना फळांचे वाटप आणि ‘माणुसकीचा घास’ उपक्रमांतर्गत अन्नदान होणार आहे. सकाळी १०.३० वाजता विसापूर येथील नगरपरिषद शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप केले जाईल. तसेच सकाळी ११ वाजता सुमानंद सभागृह गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या उपक्रमांचा उद्देश गरजू घटकांना मदत करणे, शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजसेवा घडवणे हा आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here