-मुक्तिपथ कोरची तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम, अंतर्गत मुक्तिपथ कोरची तालुका समितीची बैठक तहसीलदार सी.आर. भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करून अवैध दारू व तंबाखूवर आळा घालण्यासाठी नियोजन करण्यात आले.
सदर बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार समितीच्या केलेल्या पुनर्गठनुसार सदस्य व कार्यप्रणाली याबाबत सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या कार्यालयात दारू व तंबाखूची तपासणी करून तंबाखूमुक्त कार्यालये करणे, ग्रापं स्तरावर समितिची निवड करणे, शहरातील मोठे दुकान तपासणी, मोठ्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागास आदेश देणे, पानठेला व किराणा दुकान धारकाना नोटिस देऊन तंबाखु विक्रि बंद करने, नगरपंचायतच्या माध्यमातून वार्ड समिती गठीत करणे, बचतगटातील महिलांची बैठक घेऊन गावातील अवैध दारू व तंबाखूवर आळा घालणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी एस.आर. टिचकुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, पोलिस उपनिरीक्षक एस.आर. फडोड, गटशिक्षणाधिकारी वाय.आर. टेंभुर्णे, फुलकवर, डॉ. राहुल राऊत , वाघमारे, तालुका संघटक निळा किन्नाके आदी उपस्थित होते
