The गडविश्व
ता.प्र / धानोरा : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन धानोरा व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींच्या विशेषता मुलींच्या सुरक्षितेबाबत सायबर गुन्हे व अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयाबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण, प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोलीस स्टेशन धानोरा डॉ. विना जंबेवार इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक भिसे यांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर युवक युवतींना मौलिक प्रबोधन केले.
संचालन डॉ. गणेश चुदरी तर आभार डॉ. प्रियंका पठाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. डी बी झाडे, प्रा.ज्ञानेश बनसोड, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. प्रवीण गोहणे, डॉ. राजू किरमिरे , प्रा. सचिन धवणकर, प्रा.गीताचंद्र भैसारे, प्रा. मानतेश तोंडरे, प्रा. प्रशांत वाळके, डॉ. संजय मुरकुटे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.