स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजणार ; सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश

459

The गडविश्व
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असे आदेश दिले आहे. तर कोकण आणि मुंबईत पावसाळ्यानंतर निवडणूका घ्या असे आदेश दिले. त्यामुळे आता राज्यातील अनेक भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने याआधीच सप्टेंबरमध्ये शहरी व ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागात निवडणूका घ्याव्या असे सांगितले होते. यावर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
जिथे पाऊस कमी पडतो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागात निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असे कोर्टाने सांगितले आहे महत्त्वाचे म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडणार, हे आता नक्की झाले आहे.
राज्यात १५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २१० नगरपंचायती, १९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here