सुभाषनगर येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

144

The गडविश्व
गडचिरोली, १७ नोव्हेंबर : गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगर येथील विक्रेत्याकडून २० लिटर दारू जप्त करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथने संयुक्तरित्या केली. किरण नैताम असे आरोपीचे नाव आहे.
चामोर्शी तालुक्यातील व गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगर येथे अवैध दारूविक्री केली जाते. गावात तीन दारूविक्रेते अवैध व्यवसाय करीत आहेत. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी केली, असता एका घरी २० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी दारू जप्त करीत आरोपीवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे परिसरातील दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शिवराज दुर्गे यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here