शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचे निधन

421

The गडविश्व
मुंबई, १४ ऑगस्ट : शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते बिग बुल या नावाने ते प्रसिद्ध होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचे भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.
त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली असून गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here