शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे शिष्यवृत्ती व समान संधी केंद्र मार्गदर्शन

98

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२२ “सेवा पंधरवडानिमित्य” समाज कल्याण,आयुक्तालय पुणे व प्रादेशिक उपायुक्त कार्यालय विभाग,नागपुर यांच्या आदेशान्वये, गडचिरोलीचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमोल यावलीक यांच्या मार्गदर्शनात ३० सप्टेंबर २०२२ रोजी शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे शिष्यवृत्ती व समान संधी केंद्र मार्गदर्शन शिबीर तथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन समाज कल्याण कार्यालयीन अधिक्षक रमेश पोट्टे यांनी समाज कल्याण विभागाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीप, समान संधी, स्पर्धा परीक्षा संदर्भात संपुर्ण माहिती देऊन सत्र २०२२- २३ या शैक्षणिक सत्रासाठी महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी सुरु असुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज सादर करुन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जे. मेश्राम यांनी महाडिबीटी पोर्टलवर दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करावे अशी सुचना विद्यार्थ्यांना केली. त्याचप्रमाणे स्वाधार योजनेविषयी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करतांना लागणारी कागदपत्रे व येणाऱ्या अडचणी याबाबत सखोल माहिती श्रीमती. रुपाली अपराजीत यांनी दिली.
महाडिबीटी पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी,विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती व फ्रिशीप संदर्भात होणारे समज गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न व अर्ज विहीत मुदतीत सादर करण्याविषयीचे प्रोत्साहन तालुका समन्वयक गुरुदेव कुसरामव दिनेश किरंगे यांनी केले. सदर कार्यशाळेला प्रा.राजेंद्र गोरे,प्रा.विलास खुणे,लिपीक लोमेश दरडे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रा. रुपेश कोल्हे व आभार ग्रंथपाल श्री.संजय राऊत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here