The गडविश्व
गडचिरोली, ८ जानेवारी : आरमोरी शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मध्ये अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्याकडून १३ हजार ५०० रुपयांची मोहफुलाची दारू जप्त करून नष्ट केल्याची कृती मुक्तीपथ वॉर्ड संघटनेच्या महिलांनी केली.
आरमोरी येथील विठ्ठल मंदिर वार्ड क्रमांक ८ मध्ये एक विक्रेता चोरट्या मार्गाने अवैध दारूची विक्री करीत होता. याबाबतची माहिती मिळताच मुक्तीपथ तालुका चमू व वार्ड संघटनेच्या महिलांनी संयुक्त कारवाई करीत १३ हजार ५०० रुपयांची ४५ लिटर मोहफुलाची दारू पकडून नष्ट केली. सोबतच पुन्हा दारूविक्री करतांना आढळल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तंबी देण्यात आली. यावेळी वॉर्ड संघटनेच्या अध्यक्षा तथा नगरसेविका प्रगती नारनवरे, शिल्पा नारनवरे, कल्पना चौके, रेखा गायकवाड, कोमल मंगरे, अर्चना मडावी, माया चौके, ताराबाई चौके, मुक्तीपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, पल्लवी मेश्राम व सुष्मा वासनिक उपस्थित होते.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Muktipath)