विश्वशांती माध्यमिक विद्यालय सावलीचे सुयश

748

– विद्यालयाचा निकाल लागला ९१. ६६ टक्के
The गडविश्व
सावली : इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत सावली येथील विश्वशांती विद्यालयाचा निकाल ९१. ६६ टक्के लागला आहे.
या निकालात कुमारी गायत्री रामचंद्र तिवाडे ९०. ४६ टक्के गुण मिळवून सेमी इंग्रजी माध्यमातून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविले आहे. तर शंतनु किशोर बोरेवार ८९. ४० टक्के गुणासहीत द्वितीय क्रमांक, यश दिवाकर भंडारे ८८. ४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविले आहे.
विश्वशांती माध्यमिक विद्यालय मराठी माध्यमातून कुमारी सलोनी संतोष कावळे हिने ८१ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविले आहे. तर कु.श्रुतिका ईश्वर गद्दे ७६. २० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, कुमारी प्रज्ञा एकनाथ भोयर होणे ७३. ८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविले आहे.
गुणवंतांचे अभिनंदन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पा.संगीडवार यांनी स्वतः उपस्थित राहून केले आहे. सावली परिसरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस .मुप्पावार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष सौ. नंदाताई अल्लुरवर, सचिव राजाबाळ पा.संगीडवार, उपाध्यक्ष अनिल स्वामी, कोषाध्यक्ष डॉ. विजयराव शेंडे, सहसचिव मनोज सुरमवार आणि उपस्थित शिक्षक मेश्राम, झोडे, दुधे, बारेकर मॅडम, सुरमवार, जिवतोडे, काटपल्लीवार, गुरनुले, आदे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here