राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना

437

– अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यास अर्ज करण्याची परवानगी
The गडविश्व
मुंबई : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना भारतीयांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एनएमसीने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे.
परदेशी वैद्यकीय पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here