– कोचीनारा येथे स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील तालुक्यातील कोचीनारा येथे गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गावातील महिलांसह ४२ पुरुष, युवक, युवती सहभागी होत दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्याचा संकल्प घेतला
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ उपसरपंच रुपराम देवांगन यांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आला. अध्यक्षस्थानी गाव संघटनेचे अध्यक्ष बसंत भक्ता होते. प्रमुख अतिथी म्हणून जमकातन, माजी उपसभापती सुशीला जमकातन ,शारदा काटेंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये विविध गटातून प्रथम क्रमांक नितेश साहाडा, रुणाली काटेंगे, मुकेश कार्यपाल, भानबती बघवा, द्वितीय क्रमांक रोशन साहाडा, शिला घावडे, गणेश साहाडा, शंकुतला बागडेरीया तर तृतीय येण्याचा मान टेकलाल भक्ता, हेमलता साहाडा, टकलाल देवांगन, जैनकुमारी बागडेरीया यांनी मिळविला आहे. यशस्वी स्पर्धकांना बक्षीससह मेडल, जिल्हाधिकारी व डॉ. अभय बंग यांच्या सहीचे प्रमाणपत्र, व्यसनमुक्ती विषयावरील गाण्याचे पुस्तक इत्यादी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघटिका निळा किन्नाके, संचालन पोलिस पाटील श्रावन घावडे तर आभार सुभम बारसे यांनी मानले.