महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)
– प्रा.श्रीमंत संतोष सुरपाम यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने प्रधानमंत्री यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑक्टोबर : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्र मार्कंडा देवाचा विकास व भाविक भक्तांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मुल ते चामोर्शी रेल्वेमार्ग निर्माण करा अशी मागणी प्रा. संतोष सुरपाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदनातून केली आहे.
मुल ते चामोर्शी हा रेल्वेमार्ग फक्त २६ किमी आहे . त्यासोबत चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने हा रेल्वेमार्ग निर्माण झाल्यास दुहेरी फायद्याचे आहे. म्हणून आपण ह्या सर्व बाबीचा सारासार विचार करून हे रेल्वे मार्ग निर्माण करण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
या अगोदर महाराष्ट्र शासनाचे अपर सचिव पि.सी.मयेकर यांनी २०११ ला भारतीय रेल मंत्रालयातील रेल्वे सचिव हे मार्ग तयार करण्याचे पत्र पाठविले होते परंतु गेल्या १३ वर्षापासुन या रेल्वे मार्ग निर्माण करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे हे विशेष.


