The गडविश्व
ता. प्र / धानोरा : स्थानिक श्री जी. सी. पाटील मुनघाटे महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव निमित्याने स्वराज्य महोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रा.से.यो. विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमा अंतर्गत करण्यात आले. निबंध स्पर्धेत विवेक शेडमाके कु. करीना वरवाडे कु. सोनम आलम यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले तर (पोस्टर) चित्रकला स्पर्धेमध्ये विवेक शेडमाके कु. करीना वरवाडे, कु. सोनल अलाम, कु. सिमरन कुरेशी यांनी पुरस्कार प्राप्त केले. तर रांगोळी स्पर्धेमध्ये कु.तनिषा मशाखेत्री, कु. हिना गावतुरे, कु.प्रणोती भगत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयात करण्यात आले.रा.से.यो. अधिकारी प्रा.ज्ञानेश बनसोड व सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ.पी पठाडे यांनी आयोजक म्हणून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
सदर स्पर्धेचे परीक्षण डॉ. जी. एन. चुधरी, डॉ. पी पठाडे, प्रा. जी भैसारे यांनी केले. स्वराज्य सप्ताह उपक्रमा अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडून मोलाचे सहकार्य केले.