The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑक्टोबर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या सुचनेनूसार २६ सप्टेंबर २०२२ पासून (नवरात्री उत्सवापासून) २६ ऑक्टोबर २०२२ या एक महिण्याच्या कालावधिकरीता राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खाली DTF सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोहिमेबाबत तालुकास्तरीय प्रशिक्षण व BTF सभा घेण्यात आली. २६ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर या एक महिण्याच्या कालावधिकरीता जिल्हयातील आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवून १८ वर्षावरील सर्व महिलांची सर्वांगीन आरोग्य तपासणी करणे, आरोग्य विषयक चाचण्या करुन योग्य तो औषधोपचार करणे, गरज भासल्यास वरिष्ठस्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये संदर्भीत करणे, इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवावयाचे आहेत.
गडचिरोली जिल्हयामध्ये सदर अभियानाचे उद्घाटन अशोक नेते, खासदार, गडचिरोली चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. सदर अभियानाच्या उद्घाटन समारंभास डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली, डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जि.प. गडचिरोली, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकिय अधिकारी, सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. २६ सप्टेंबर पासून जिल्हयातील सर्व १८ वर्षावरील तसेच गरोदर माता यांची सर्वांगीन आरोग्य तपासणी करुन आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने दंत शिबीर, आर के एस के कार्यक्रमांतर्गत आरोग्य व पोषण विषयी समुपदेशन कॅम्प, गर्भधारणापुर्व सेवा कार्यक्रम शिबीरे, मानव विकास शिबीरे, ३० वर्षावरील महिलांची असंसर्गजन्य आजाराबाबत तपासणी तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत महिलांची तपासणी करण्यात येत आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या ९ दिवसांच्या कालावधिमेध्ये ४७,२०४ एवढया १८ वर्षावरील महिलांची तपासणी वैद्यकिय अधिकारी यांचेव्दारा करण्यात आलेली असून त्यामध्ये ८,२३२ गरोदर माता यांचा समोवश आहे तर ३१,७६४ महिला हया ३० वर्षावरील आहेत.